बालिकेवर अत्याचार व खून, आरोपीला फाशीची शिक्षा; न्यायालयाचा अतिजलद निकाल

 बालिकेवर अत्याचार व खून, आरोपीला फाशीची शिक्षा; न्यायालयाचा अतिजलद निकालनांदेड : नांदेड जिल्ह्यातील भोकर  तालुक्यातील एका शेतक-याच्या 5 वर्षीय बालिकेवर पाशवी अत्याचार करुन तिची हत्या करण्यात आल्याच्या अमानुष घटना घडली होती. सदर गंभीर गुन्ह्याचा खटला भोकर जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालयात चालविण्यात आला होता. सबळ पुराव्यांवरुन  आरोपी विरुद्धचा गुन्हा सिद्ध झाल्याने जिल्हा न्यायाधीश मुजीब एस.शेख यांनी त्या क्रूरकर्मा आरोपीस आज 23 मार्च रोजी  मरेपर्यंत फाशीची शिक्षा सुनावली आहे.सदरील गंभीर गुन्ह्याचा निकाल अवघ्या तेवीस दिवसात दिल्याने पीडित मयत व कुटूंबियांस न्याय मिळाला असल्याची प्रतिक्रिया जनसामान्यातून व्यक्त होत आहे.

दिवशी बु.(ता.भोकर)येथील एका शेतक-याच्या 5 वर्षीय निष्पाप बालिकेवर अमानवी, नैसर्गिक आणि अनैसर्गिक अत्याचार करुन तिची हत्या सालगड्याने केल्याची संतापजनक घटना 20 जानेवारी 2021 रोजी घडली होती. या प्रकरणी पिडीत मयत मुलीच्या वडीलांनी फिर्याद दिल्यावरुन मुलीस पळवून नेऊन अत्याचार करुन खून केल्याचा आणि बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायदा (पोक्सो) नुसार आरोपी बाबूराव उखंडू सांगेराव उर्फ बाबूराव माळेगावकर(35) (रा.दिवशी बु.याच्या विरुद्ध) भोकर पोलिसांत 21 जानेवारी 2021 रोजी गुन्हा दाखल करण्यात आला होता. तसेच भोकर पोलीसांनी आरोपीस त्याच दिवसी घटनास्थळावरुन सबळ पुराव्यानिशी अटक केली होती.


घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन भोकर उपविभागीय पोलीस अधिकारी गोपाळ रांजणकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक विकास पाटील यांनी तपासचक्र गतीमान करुन सखोल तपासाअंती अवघ्या 19 दिवसात सदरील गुन्हयाचे दोषारोपपत्र 10 फेब्रुवारी 2021 रोजी भोकर जिल्हा व अतिरीक्त सत्र न्यायालयात दाखल केले.

1 मार्च 2021 पासून न्यायालयात सदरील खटल्याची तपासणी सुरु झाली. दरम्यानच्या काळात न्यायालयाने 15 साक्षीदार तपासले. यात सरकारी वकील अॅड.रमेश राजुरकर आणि आरोपीचे वकील यांच्यात झालेल्या युक्तीवादाअंती आणि साक्षीदाराची साक्ष, घटनास्थळावरील सबळ पुरावे, वैद्यकीय अहवाल आदी आरोपी विरुद्ध गेले. यावरून आरोपी विरुध्दचा सर्व कलमांनुसारचा गुन्हा अखेर सिद्ध झाला होता.  सरकारी वकिल ऍड. रमेश राजूरकर यांना  न्यायालयिन कामकाजात ऍड.स्वप्नील कुलकर्णी व ऍड. सलीम यांनी सहकार्य केले आहे तर पैरवी अधिकारी म्हणवून पो.ना.फेरोज खान यांनी काम पाहिले आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post