भाजपला धक्का... माजी विधानसभा अध्यक्ष जिल्हा बँकेच्या निवडणुकीत पराभूत

 विधानसभेचे माजी अध्यक्ष हरिभाऊ बागडे जिल्हा बँकेच्या निवडणुकीत पराभूतऔरंगाबाद : औरंगाबाद जिल्हा बँकेच्या निवडणुकीत माजी विधानसभा अध्यक्ष आणि बँकेचे संचालक असलेले हरिभाऊ बागडे यांना पराभवाचा धक्का बदलाय. या निवडणुकीत अनेक अनपेक्षित निकाल पाहायला मिळत आहेत. जिल्ह्याच्या सहकार क्षेत्रातील मोठं नाव असलेल्या बागडेंचा पराभव हा जिल्ह्याच्या राजकारणाचं बदललेलं वार असल्याचं बोललं जात आहे.

जिल्हा बँक निवडणुकीत बागडे यांच्या पॅनलचा मात्र दणदणीत विजय झाला आहे. मात्र स्वत: बागडे यांना पराभवाचा सामना करावा लागलाय. अपक्ष उमेदवार अभिषेक जैस्वाल यांनी बागडे यांचा पराभव केलाय. बागडे यांना एकूण 123 मतं मिळाली, तर जैस्वाल यांना 147 मतं पडली. त्यामुळे जैस्वाल यांनी 24 मतांनी बागडे यांचा पराभव केला आहे. बिगर शेती संस्थेच्या विभागातून बागडे यांचा पराभव झाला आहे.हरिभाऊ बागडे यांच्यासह अभिजित देशमुख यांनाही पराभवाचा सामना करावा लागला आहे. तर अपक्ष उमेदवार अभिषेक जैस्वाल आणि जगन्नाथ काळे विजयी झाले आहेत. मतमोजणीदरम्यान बागडे हे मतमोजणी केंद्रावर आले होते. पण पराभवाची चाहूल लागताच ते माघारी परतले.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post