अर्थसंकल्पात स्व. गोपीनाथराव मुंडे ऊसतोड कामगार कल्याण महामंडळासाठी भरीव तरतूद

 

अर्थसंकल्पात स्व. गोपीनाथराव मुंडे ऊसतोड कामगार कल्याण महामंडळासाठी भरीव तरतूद

माझ्या आयुष्यातील सर्वात आनंदाचा दिवस – सामाजिक न्याय व विशेष सहाय्यमंत्री धनंजय मुंडे यांनी  मानले उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे आभारमुंबई, दि. 8 : गेल्या अनेक वर्षांपासून केवळ चर्चेत राहिलेल्या स्व. गोपीनाथराव मुंडे ऊसतोड कामगार कल्याण महामंडळाला आता जोपर्यंत महाराष्ट्रात ऊस पिकतो तोपर्यंत निधीची कमतरता भासणार नाही, अशी माहिती सामाजिक न्याय व विशेष सहाय्यमंत्री श्री.धनंजय मुंडे यांनी आज राज्याचा अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर दिली.

उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री श्री. अजित पवार यांनी ऊस गाळपावर प्रत्येक कारखान्यास प्रतिटन १० रुपये सेस लावण्यात येईल व तेवढीच रक्कम राज्य शासन महामंडळाला देईल अर्थात प्रतिटन उसाच्या मागे महामंडळाला २० रुपये मिळतील, याद्वारे कोट्यवधी रुपयांचा निधी महामंडळ व्यवस्थापनास उपलब्ध होईल, जोपर्यंत ऊस हे पीक राज्यात घेतले जाईल, तोपर्यंत आता ऊसतोड कामगार कल्याण महामंडळाला निधीची कमतरता भासणार नाही!

स्व.गोपीनाथ मुंडे यांच्या नावाने स्थापन करण्यात आलेल्या या महामंडळास आजपर्यंत एक रुपयाही निधी देण्यात आला नव्हता, मागील सरकारच्या काळात अनेकवेळा घोषणा करूनही या महामंडळाच्या रचना किंवा धोरणाबाबत काहीही कार्यवाही झाली नाही. महाविकास आघाडी सरकारने आता जोपर्यंत ऊस टिकेल तोपर्यंत हे महामंडळ स्वयंभू राहील, अशी व्यवस्था केल्याने हा आपल्या जीवनातील सर्वात आनंदाचा दिवस आहे, असे सामाजिक न्याय व विशेष सहाय्यमंत्री श्री. मुंडे म्हणाले.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post