कंटेनर पळवणारा आरोपी ४ तासात जेरबंद, 90 लाखांचा मुद्देमाल जप्त

 राष्ट्रीय महामार्गावरुन कंटेनर पळवणारा आरोपी ४ तासात जेरबंद, 90 लाखांचा मुद्देमाल जप्त 


                                                   छाया: विक्रम बनकर

नगर : मारुती सुझुकी कंपनीच्या  सेलेरीया, वॅगनर, स्वीप्ट डिझायर अशा एकुण 7 नवीन गाडया दिल्ली वरुन गोवा येथे घेऊन जात असतांना संगमनेर तालुक्यातील हिवरगाव पावसा टोलनाक्याजवळ चहा पिण्यासाठी कंटेनर थांबला. त्यावेळी कंटेनरची हवा चेक करता असतांना  पाठीमागुन  काळे रंगाच्या बुलेट मोटार सायकलवर आलेल्या इसमांने फिर्यादीस शिवगाळ करुन मारहाण करुन त्याचे जवळील कटरचा धाक दाखवुन त्याचे इतर ४ साथीदारांना बोलावुन घेऊन फिर्यादीचा कंटेनर दरोडा घालुन पळवुन नेला. याबाबत १०० नंबरवर माहिती मिळाल्याने आरोपीचा हिवरगाव पावसा, संगमनेर परीसरात शोध घेता तो मिळुन आल्यांने त्यास ताब्यात घेण्यात आले. त्यांच्या ताब्यातून  कंटेनर( क्रं. एच.आर ३८ डब्ल्यु ८१२०) व त्यातील सात नविन चारचाकी वाहनांसाह ताब्यात घेतले. त्याचेकडुन रोख रक्कम २५०० /- रुपये, फिर्यादीचे एच.डी एफ.सी कार्ड, सॅमसंग कंपनीचा मोबाईल फोन ,तसेच गुन्हयात वापरलेल हिरव्या रंगाचे कटर असा ९०,०२,५०० रु किं.चा मुददेमाल जप्त करण्यात आला आहे.  अकलाख असिम ऊर्फ अकलाक असिफ शेख( रा. खलीलपुरा (कागदीपुरा) ता. जुन्नर जि.पुणे ह.रा. कुरण, ता.संगमनेर) यास गुन्हयात अटक करण्यात आली आहे. यापुर्वी सदर आरोपी यावर जुन्नर पोलीस स्टेशनला  गुन्हा दाखल असुन सदर आरोपीवर इतर ठिकाणी गुन्हे दाखल आहेत काय? याबाबत पुढील तपास चालू आहे.  गुन्हयातील इतर फरार ४ आरोपींचा शोध चालु आहे.

सदरची धाडसी व तत्पर कामगिरी पोलीस अधीक्षक  मनोज पाटील  अपर पोलीस अधीक्षक श्रीरामपूर  दिपाली काळे,  उपविभागीय पोलीस अधिकारी संगमनेर राहुल मदने, यांचे मार्गदर्शनाखाली पो.नि. पांडुरंग पवार, संगमनेर तालुका पोलीस स्टेशनचे स.फो ईस्माईल शेख . पो.ना/ बाबा खेडकर, पो.ना राजेंद्र घोलप, पो.ना यमना जाधव, चालक पो.ना ओंकार शेंगाळ, पो.ना शिवाजी डमाळे, पो.ना दत्तात्रय मेंगाळ, पोशि अशोक गायकवाड, होमगार्ड नित्यानंद बापु गिरीगोसावी , अमोल दत्तु बुरकुल यांनी केली आहे.सदर गुन्ह्याचा पुढील तपास पो.नि  पांडुरंग पवार यांचे मार्गदर्शनाखील स. फौ आय.ए.शेख हे करीत आहेत.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post