जिल्ह्यात कडक निर्बंध लागू, 'या' गोष्टींना मनाई

 जिल्ह्यात रात्री ८ ते सकाळी ७ पर्यंत जमावबंदी आदेश जारीनगर : राज्य सरकारच्या आदेशानुसार नगर जिल्ह्यात प्रतिबंधक उपाययोजनांची अंमलबजावणी सुरू करण्यात आली आहे. जिल्हा प्रशासनाने याबाबतचे आदेश २८ मार्च रोजी जारी केले आहेत.

अ) सार्वजनिक ठिकाणी पाच किंवा त्यापेक्षा अधिक व्यक्ती एकत्र येण्यास मनाई राहील. रात्री 8.00 ते सकाळी 7.00 दरम्यान

5 किंवा त्यापेक्षा अधिक व्यक्ती एकत्र आल्यास प्रति व्यक्ती रु.1000/- दंड आकारण्यात येईल.

ब) अत्यावश्यक सेवा वगळता इतर कामांसाठी व्यक्तीच्या हालचालीवर | फिरण्यावर रात्री 9.00 ते सकाळी 6.00

या कालावधीत निबंध राहील.


1) Containment Zone

• Containment Zone साठी यापूर्वीच्या आदेशाव्दारे असलेले सर्व निबंध लागू राहतील. Containment Zone चे सिमांकन ६अंतर्गत कार्यपध्दती याबाबत राज्य व केंद्र शासनाव्दारे वेळोवेळी जारी केलेले निर्देश लागू राहतील.

• Containment Zone मध्ये आढळलेल्या कोरोना बाधीत रुग्णांच्या संपर्कातील व्यक्तींचा यादी करुन शोध घेणे तसेचत्यांना अलग ठेवणे व 14 दिवस संपर्कात राहणे. (80% संपर्कातील व्यक्तींचा 72 तासांच्या आत शोध घेणे)

2) सार्वजनिक ठिकाणी पाच किंवा त्यापेक्षा अधिक व्यक्ती एकत्र येण्यास मनाई राहील. रात्री 8.00 ते सकाळी 7.00 दरम्यान 5 किंवा त्यापेक्षा अधिक व्यक्ती एकत्र आल्यास प्रती व्यक्ती रु.1000/- दंड आकारण्यात येईल.

3) सर्व सार्वजनिक ठिकाणे (उद्याने, बागा इ.) रात्री 8.00 ते सकाळी 7.00 दरम्यान बंद राहतील. उल्लंघन केल्यास प्रती

व्यक्ती रु.1000/- दंड आकारण्यात येईल.

4) विनामास्क आढळलेल्या व्यक्तीस रु.500/- दंड आकारण्यात येईल. सार्वजनिक ठिकाणी थुकताना आढळलेल्या व्यक्तीसरु.1000/- दंड आकारण्यात येईल.

5) सर्व सिनेमा हॉल्स (एकल पडदा व मल्टिप्लेक्स), प्रेक्षागृह, मॉल्स, हॉटेल्स , रेस्टॉरंटस् , हे रात्री 8.00 ते सकाळी 7.00 या कालावधीत बंद राहतील. परंतु हॉटेल्स, रेस्टॉरंटस्, यांना घर पोच सेवा आणि पार्सल सुविधा देण्यास मान्यता राहील.आदेशाचे उल्लंघन झाल्यास, संबंधित सिनेमा हॉल्स, प्रेक्षागृह, मॉल्स, हॉटेल्स, रेस्टॉरंटस् हे केंद्र शासनाव्दारे कोविड-19साथरोग हा आपत्ती म्हणुन जाहीर केलेल्या कालावधी पर्यत बंद करण्यात येतील. तसेच उल्लंघन केलेले ठिकाणचे मालकास आपत्ती कायद्मातंर्गत दंड देखील केला जाईल.

6) सर्व प्रकारच्या सामाजिक, सांस्कृतिक, राजकिय, धार्मिक कार्यक्रमासाठी एकत्र येण्यास मनाई राहील. प्रेक्षागृह किंवा

नाट्यगृहे यांचा सदर कार्यक्रमास वापर करण्यास मनाई राहील. याबाबत उल्लंघन झाल्यास संबंधित ठिकाणचे मालकास आपत्ती कायद्यांतर्गत दंड केला जाईल. तसेच केंद्र शासनाव्दारे कोविड-19 साथरोग हा आपत्ती म्हणुन जाहीर केलेल्या कालावधी पर्यत सदर मालमत्ता बंद करण्यात येईल.

7) फक्त विवाह समारंभास जास्तीत-जास्त 50 व्यक्तींना एकत्र येण्यास निबंध असणार नाहीत.

मंगल कार्यालय, लॉन्स, मॅरेज हॉल व लग्न समारंभाचे ठिकाणी लग्न समारंभासाठी आलेले व-हाडी, पाहुणे मंडळी,

मंगल कार्यालयातील कर्मचारी, आचारी व इतर उपस्थित सर्व व्यक्ती मिळून जास्तीत-जास्त 50 व्यक्तींनाच उपस्थित राहता येईल.

लग्न समारंभ आयोजित करण्यात आलेल्या ठिकाणी स्वच्छता ठेवावी. टेबल, खुर्व्या, पाण्याचे नळ व हाताळण्यात येणारे सर्व वस्तूंचे पृष्ठभाग इत्यादीचे निर्जतुकीकरण करण्यात यावे.

मंगल कार्यालय, लॉन्स, मेरेज हॉल व लग्न समारंभाचे ठिकाणच्या आस्थापणांना लग्न समारंभासाठी येणा-या सर्व

व्यक्तींचे थर्मल स्कॅनर व्दारे स्क्रिनिंग करणे तसेच फुट (Foot) ऑपरेटेड सॅनिटायझर डिस्पेन्सरचा वापर करणेबंधनकारक राहील.

लग्न समारंभात शारीरिक अंतराचे (Physical distancing) चे पालन करण्यात यावे. दोन व्यक्तींमध्ये कमीत-कमी 6फुटांचे अंतर ठेवावे.

.

.

.


0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post