प्रतिबंधक उपाययोजनांची कडक अंमलबजावणी... 'लॉकडाऊन'बाबत जिल्हाधिकारी म्हणाले...

 करोना प्रतिबंधक उपाययोजनांची कडक अंमलबजावणी करण्यावर भर, तूर्तास लॉकडाऊन नाही: जिल्हाधिकारीनगर : लॉकडाऊन करावे अशी परिस्थिती सध्या तरी दिसत नाही. त्यामुळे अन्य उपाययोजनांची कडक अंमलबजावणी करण्यावर भर देणार. नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी केले आहे. आज सायंकाळी पत्रकार परिषदेत त्यांनी करोना प्रतिबंधक उपाययोजनांबाबत माहिती दिली.

जिल्ह्यात गर्दीला आळा बसण्यासाठी आठवडे बाजार बंद करण्यात आले आहे. लग्न समारंभासाठीही आता पोलिस परवानगी बंधनकारक करण्यात आली आहे. नागरिकांनी नियमांचे काटेकोर पालन केल्यास लॉकडाऊन ची गरज भासणार नाही असेही त्यांनी सांगितले.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post