जिल्हाधिकारी, पोलिस अधीक्षक उतरले रस्त्यावर, रूग्णवाढ सुरू झाल्याने प्रशासनाकडून 'सूचक' पाऊल

जिल्हाधिकारी, पोलिस अधीक्षक उतरले रस्त्यावर, करोना प्रतिबंध नियमांचे पालन करण्याचे आवाहननगर : कोरोना संसर्ग रोखण्यासाठी जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले आज थेट रस्त्यावर उतरले. विनामास्क फिरणाऱ्या आणि इतरांच्या आरोग्यास धोका निर्माण करणाऱ्या नागरिकांवर त्यांनी दंडात्मक कारवाई केली. जिल्हा पोलिस अधीक्षक मनोज पाटील आणि मनपा आयुक्त शंकर गोरे यांच्यासह आज जिल्हाधिकारी डॉ.भोसले यांनी भिंगारवाला चौक, स्वस्तिक बस स्टँड, जिल्हा परिषद आणि जिल्हाधिकारी कार्यालयातील काही विभागांना अचानक भेटी दिल्या आणि विनामास्क असणाऱ्या व्यक्तीवर कारवाई केली.नगर शहरासह जिल्ह्यात करोनाचा वेगानं फैलाव होत आहे. रोज नवीन बाधितांची संख्या वाढत आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने निर्बंध लावण्यास सुरुवात केली आहे. राज्यातील अनेक शहरांमध्ये कडक लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे. ही वेळ येऊ द्यायची नसेल तर नगरकरांनी काळजी घेण्याची व नियम पाळण्याची गरज आहे, असाच अप्रत्यक्ष संदेश प्रशासनाने दिला आहे.0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post