स्वाक्षरी नसलेल्या 'त्या' पत्राचा 'सोर्स'ही तपासला जाणार, मुख्यमंत्री कार्यालयाचं स्पष्टीकरण

 स्वाक्षरी नसलेल्या 'त्या' पत्राचा 'सोर्स'ही तपासला जाणार, मुख्यमंत्री कार्यालयाचं स्पष्टीकरण मुंबई: परमबीर सिंग यांच्या या पत्राबाबत मुख्यमंत्री कार्यालयाकडून एक स्पष्टीकरण देण्यात आलं आहे. गृहरक्षक दलाचे कमांडट जनरल परम बीर सिंग यांच्या नावाने मुख्यमंत्री सचिवालयाच्या अधिकृत इमेलवर आज दुपारी 4.37 वाजता पत्र प्राप्त झाले आहे. paramirs3@gmail.com या ईमेल पत्त्यावरून परम बीर सिंग असे केवळ नाव लिहिलेले व स्वाक्षरी नसलेल्या या पत्राचा ईमेल पत्ता तपासून घेण्यात येत आहे , त्याचप्रमाणे परम बीर सिंग यांना गृहविभागामार्फत संपर्क साधण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. वास्तविक पाहता परम बीर सिंग यांनी अधिकृतरीत्या आयपीएस अधिकाऱ्यांच्या यादीसाठी दिलेला वैयक्तिक ईमेल पत्ता parimbirs@hotmail.com असा आहे त्यामुळे आज प्राप्त झालेला ईमेल तपासून घेणे आवश्यक आहे, असं मुख्यमंत्री कार्यालयाकडून स्पष्ट करण्यात आलं आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post