धोनीने संन्यास घेतला आहे का?

धोनीने संन्यास घेतला आहे का? चेन्नई : भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार एमएस धोनी सध्या इंडियन प्रीमियर लीगच्या 14 व्या सत्रासाठी सराव करीत आहे.  परंतु आता धोनीचा एक फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. धोनीच्या या नव्या फोटोमुळे त्याच्या चाहत्यांना आश्चर्यचकित केले आहे. कारण या फोटोमध्ये धोनी बौद्ध भिक्खूसारखा दिसत आहे. आयपीएल 2021 पूर्वी धोनीने सांसारिक मोह मायेपासून संन्यास घेतला आहे का? असा सवाल काहीजण उपस्थित करु लागले आहेत. धोनीचा हा फोटो स्टार स्पोर्ट्सच्या अधिकृत ट्विटर हँडलवरुन शेअर करण्यात आला आहे. या फोटोमध्ये दिसतेय की धोनीने टक्कल केलं आहे आणि बौद्ध भिक्खूसारखे कपडे घालून तो जंगलात बसला आहे. सोशल मीडियावर धोनीचा हा फोटो पाहून लोक वेगवेगळ्या प्रतिक्रिया व्यक्त करीत आहेत. धोनीने संन्यास घेतला आहे का? असा सवा सोशल मीडियावर उपस्थित केला जात आहे.  काहींचे मत आहे की, हा फोटो एखाद्या जाहीरातीचा भाग असू शकतो.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post