रेखा जरे खून प्रकरणात मुख्य संशयित बाळ बोठे फरार घोषित,...तर संपत्ती होणार जप्त

रेखा जरे खून प्रकरणात मुख्य संशयित बाळ बोठे फरार घोषित,...तर संपत्ती होणार जप्तनगर: यशस्वीनी महिला ब्रिगेडच्या अध्यक्षा रेखा जरे हत्याकांडातील मास्टरमाईंड बाळ बोठेला फरार घोषित करण्यात आले आहे.  न्या. उमा बोर्‍हाडे यांनी हा आदेश दिला. दरम्यान न्यायालयाने दिनांक 9 एप्रिल पर्यंत त्याला स्वतःहून न्यायालयासमोर हजर राहण्यास सांगितले आहे. जर तो हजर राहिला नाही तर त्याची प्रॉपर्टी जप्त करण्यासह अन्य पुढील कारवाई करण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहे.


रेखा जरे यांची हत्याझाल्यापासून गुन्ह्यातील मास्टरमाईंड बाठ बोठे अद्यापही फरार आहे. बोठेला फरार घोषित करण्यात यावे याबाबत अर्ज दाखल झाला होता. त्यावर तीन मार्चला सुनावणी झाली असून आजबाळ बोठेला फरार घोषित करण्यात आले आहे. 

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post