माणिक खेडकर यांच्यावर राजकीय आकसातून गुन्हा दाखल, आ.मोनिका राजळेंसह जिल्हा भाजपचे पोलिस अधीक्षकांना निवेदन

 राजकीय आकसापोटी नेवासा येथील पोलिस निरीक्षक यांनी दाखल केलेल्या गुन्हा बाबत 

भाजपचे जिल्हा पदाधिकारी यांचे वतीने पोलिस अधीक्षक यांना निवेदन नगर- भाजप पाथर्डी तालुका अध्यक्ष माणिक कोंडीबा खेडकर यांच्यावर नेवासा पोलिस स्टेशन येथे दि ०६-०३-२०२१ रोजी गुन्हा क्रमांक १३०-२१ या कलम अंतर्गत ३०७,२५/३/४ ,५०४,५०६ या अन्व्ये खोटा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.या संदर्भात कायदेशीर कारवाई चालू असताना दिनांक २८-०३-२०२१ रोजी कलम ३७६,पोस्को ,अट्रासिटी कलमांतर्गत दुसरा गुन्हा त्याचं पोलिस स्टेशनला दाखल करण्यात आला आहे ,दिनांक ०६-०३-२०२१ रोजी माणिक खेडकर यांच्यावर फिर्यादी बंटी वाघ यानी गुन्हा दाखल केलेला आहे ,परंतु २८-०३-२०२१ च्या गुन्ह्यामध्ये दिनांक ०६-०३-२०२१ चा फिर्यादी व आरोपी हे दोघे मिळून संबंधित पीडितेवर अत्याचार केला अशा पद्धतीचा खोटा गुन्हा दाखल केलेला आहे .पहिला दाखल करून घेणारे अधिकारी व दुसरा दाखल करून घेणारे अधिकारी हे एकाच पोलिस स्टेशनचे असताना व त्यांना सर्व हकीगत माहिती असताना पहिल्या गुन्ह्यात आरोपीना अदयाप  जामीन नाही अशा वेळेस पहिला गुन्ह्या तील आरोपी व फिर्यादी एकत्र येऊन अत्याचार कसे करू शकतात ? 
वरील सर्व घटनाक्रम पाहिल्यानंतर असे लक्षात येते कि ,पोलिस निरीक्षक नेवासा यांनी पहिला गुन्हा हा खोट्या पद्धतीचा दाखल केला आहे .या मध्ये कलम ३०७ सारखे गंभीर कलम लावून जाणून बुजून त्रास देण्याचे कटकारस्थान केले आहे व त्यानंतरचा गुन्हा खोट्या स्वरूपाचा वेगळ्या उद्देशाने दाखल केलेला आहे त्यामुळे माणीक खेडकर यांच्या कुटूंबामध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झालेले आहेे.
. यावरून असे लक्षात येते कि महाराष्टात गाजत असलेले वाजे व नेवाशातील करे हे खोटे गुन्हे दाखल करण्यात मास्टर आहेत .तरी पोलिस अधीक्षक साहेबानी माणिक खेडकर यांच्या कुटूंबावर दाखल केलेले कलम ३०७,३७६    पोस्को ,अट्रासिटी या सारखे गंभीर गुन्हे मागे घ्यावेत व पोलिस निरीक्षक करे यांना तात्काळ निलंबित करून योग्य ती
 कायदेशीर कारवाई करण्यात यावी हि नम्र विनंती 
जिल्हा पोलिस अधीक्षक यांना  भाजपाच्या वतीने निवेदन देण्यात आले यावेळी आमदार मोनिका राजळे ,जिल्हाध्यक्ष अरुण मुंढे ,दिलीप भालसिंग ,महेंद्र गंधे ,मोहनराव पालवे ,बाबासाहेब सानप ,अभय आव्हाड ,संभाजी पालवे ,सोमनाथ खेडकर ,धनंजय बडे ,संजय बडे ,राहुल कारखेले ,अमोल गर्जे ,बाळासाहेव घुले ,संजय कीर्तने ,पिराजी कीर्तने ,डॉ राजेंद्र खेडकर ,बजरंग घोडके ,राम हरी खेडकर ,मुकुंद  गर्जे, बंटी लांडगे ,मनोज कोकाटे ,देविदास खेडकर ,सुनील ओव्हळ ,मृत्युजंय गर्जे आदी उपिस्थत होते 

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post