भाजप व राष्ट्रवादीचे 'मिले सूर मेरा तुम्हारा', मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची कोंडी!


भाजप व राष्ट्रवादीचे 'मिले सूर मेरा तुम्हारा', लॉकडाऊन लावण्यावरून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची कोंडी! मुंबई: राज्यात करोना वाढत असून त्यासाठी राज्यातील विविध शहरांमध्ये लॉकडाऊन करण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीने राज्यात लॉकडाऊन करण्यास विरोध केला आहे. थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडेच राष्ट्रवादीने लॉकडाऊनला विरोध दर्शविला आहे. प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या भाजपपाठोपाठ सत्तेत असलेल्या राष्ट्रवादीने थेट लॉकडाऊनला विरोध केल्याने मुख्यमंत्र्यांची चांगलीच कोंडी होण्याची शक्यता आहे.राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी लॉकडाऊन बाबतची राष्ट्रवादीची भूमिका स्पष्ट केली. राज्यात कोरोनाची संख्या झपाट्याने वाढत असल्याने लॉकडाऊनचा विचार आला आहे. पण लॉकडाऊन हा अंतिम पर्याय होऊ शकत नाही. तसा आग्रहच आम्ही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना करण्यात आला आहे, असे नवाब मलिक यांनी सांगितलं.आज सकाळीच भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनीही राज्यातील लॉकडाऊनला भाजप विरोध करेल असे जाहीर केले.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post