अवकाळीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान, भाजपने केली 'इतक्या' मदतीची मागणी

 अतिवृष्टी व गारपीटमुळे जिल्ह्यातील नुकसानग्रस्त शेतकरींना पिकासाठी हेकटरी २५ हजार तर फळबागांसाठी ५० हजार नुकसानभरपाई देण्यात यावी - भाजपा जिल्हाध्यक्ष अरुण मुंढे यांची जिल्हाधिकारी यांना निवेदनाद्वारे मागणी नगर- नगर जिल्ह्यात मागील तीन चार दिवसापासून सुरु असलेले अवकाळी पावसामुळे अनेक गावात  अतिवृष्टी व गारपीटमुळे अनेक शेतकरी यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहेत .
तसेच यापूर्वीचा कोरडा दुष्काळ व मागील वर्षीचा  अतिवृष्टी यातून शेतकरी कुठे सावरत असताना श्रम आणि पेसा पणाला लावून शेतकरींनी पीक जोमात आणले असताना गारपिटीमुळे शेतकरी हवालदिल झाला आहे .यामध्ये गहू,हरभरा ,कांदे,मका,ऊस,टरबूज ,खरबूज ,तसेच आंबा ,संत्री ,द्राक्षे ,मोसंबी,चिंच  या फळबागांचे मोठ्या प्रमाणवर नुकसान झाले आहे शेतकरींना या आर्थिक हाणीतून सावरण्यासाठी नुकसानीचे पंचनामे करून त्यांना लवकरात लवकर मदत मिळने गरजेचे आहे ,मागील वर्षीची गारपिटीने नुकसान भरपाई अदयप शेतकरींना मिळाली नाही ,तीही नुकसान भरपाई लवकर देण्यात यावी अशी मागणी भाजपचे जिल्हाध्यक्ष अरुण मुंढे यांनी निवासी जिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे 
भाजपच्या वतीने नगर जिल्ह्यातील शेतकरींना अतिवृष्टी व गारपीटमुळे  नुकसानग्रस्त भरपाई देण्यात यावी याचे निवेदन निवासी उपजिल्हाधिकारी संदीप निचित यांना जिल्हाध्यक्ष अरुण मुंढे यांनी दिले .यावेळी माजी आमदार शिवाजीराव कर्डीले ,प्रसाद ढोकरीकर ,कचरू चोथे ,बाळासाहेब महाडिक ,दिलीप भालसिंग ,र्भाजी सूळ ,आजिनाथ हजारे ,शामराव पिपळे आदी उपस्थित होते 

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post