RTOच्या आदेशानंतरही बाजार समितीचे प्रवेशद्वार खुले करण्याकडे दुर्लक्ष, प्रा.शशिकांत गाडे यांची जिल्हाधिकार्यांकडे तक्रार

 RTOच्या आदेशानंतरही बाजार समितीचे प्रवेशद्वार खुले करण्याकडे दुर्लक्ष, प्रा.शशिकांत गाडे यांची जिल्हाधिकार्यांकडे तक्रार
नगर : जिल्हा रस्ता सुरक्षा समितीच्या बैठकीत निश्चित झाल्याप्रमाणे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी यांनी नगर तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीचे बंद असलेले प्रवेश द्वार खुले करण्याचे पत्र दि.१८/०२/२०२१ रोजी बाजार समिती सचिवांना दिले होते. मात्र तरीही यांची अंमलबजावणी करण्यात आलेली नाही. बाजार समितीने या आदेशाला केराची टोपली दाखवली आहे. परिणामी अनेक व्यापाऱ्यांना शेतकयांना तसेच नागरिकांना मोठा त्रास होत आहे, अशी तक्रार शिवसेना जिल्हाप्रमुख शशिकांत गाडे यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. 

गेट बंद असल्याने व्यापार्यांच्या व्यवसायावर गेल्या २ते अडीच वर्षापासून परिणाम झालेला आहे व आताही परिणाम होत आहे. त्यात कोव्हीड- १९ च्या कठीण काळात व्यापारी, शेतकरी जगला पाहिले. कृषि उत्पन्न बाजार समिती हे प्रवेशद्वार उघडण्यास हेतुपुरस्सर टाळाटाळ करत आहे. व त्यांची मानसिकताही दोन ते तीन वर्षापासून प्रवेशद्वार उघडण्याची दिसून येत नाही.  येथील व्यापारी वर्गाने हाईट बॅरीकेट बसवण्यासाठी तयारीही दर्शविली आहे. त्यामुळे आपण सदर प्रवेशद्वार खुले करण्याचे आदेश जारी करावेत अशी मागणी प्रा.गाडे यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे केली आहे.


0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post