बाळ बोठेला अटक करताना त्याच्या खिशात सापडली सुसाईड नोट, 20 मार्चपर्यंत पोलिस कोठडी

 बाळ बोठेला अटक करताना त्याच्या खिशात सापडली सुसाईड नोट, 20 मार्चपर्यंत पोलिस कोठडीनगर : यशस्विनी महिला ब्रिगेडच्या अध्यक्षा रेखा जरे खून प्रकरणातील मुख्य संशयित  बाळ बोठे याला आज रविवारी पोलिसांनी न्यायालयात हजर केले. त्याला दि. 20 मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. बाळ बोठेला शनिवारी 13 मार्चला हैदराबादवरुन अटक करण्यात आली. त्यानंतर त्याला पारनेर न्यायालयात हजर केलं असता, न्यायालयाने त्याला 7 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. दरम्यान, बाळ बोठेच्या खिशात एक सुसाईड नोट सापडल्याचा खुलासा अहमदनगर पोलिसांनी केला आहे. पोलिस अधीक्षक मनोज पाटील यांनी पत्रकार परिषदेत महत्वपूर्ण माहिती दिली.

बाळ बोठेला पकडण्यासाठी पोलिसांनी हैदराबादेत 5 दिवसांचं सर्च ऑपरेशन राबवलं. त्यासाठी पोलिसांनी एकूण 6 पथकं बनवली होती. या काळात बाळ बोठे 3 वेळा पोलिसांना गुंगारा देत पसार झाला होता. आरोपीने आपल्या फोन रात्री बंद केला होता. पोलिसांनी हैदराबादेतील 5 हॉटेलमध्ये त्याचा शोध घेतला. पण अखेर तो 6 व्या हॉटेलमध्ये लपून बसल्याचं पोलिसांना आढळून आलं. दरम्यान, बाळ बोठेच्या खिशात एक सुसाईड नोट सापडल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. त्यात आत्महत्या करणार असल्याचा उल्लेख आहे. त्याच बरोबर माझा नैसर्गिक किंवा अपघाती मृत्यू झाला तर कुणाला संपर्क करावा, याची माहिती त्या सुसाईड नोटमध्ये लिहून ठेवण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post