Breaking...रेखा जरे खून प्रकरणात मुख्य संशयित बाळ बोठे पोलिसांच्या ताब्यात

 

रेखा जरे खून प्रकरणात मुख्य संशयित बाळ बोठे  पोलिसांच्या ताब्यातनगर : यशस्विनी महिला ब्रिगेडच्या अध्यक्षा रेखा जरे खून प्रकरणातील मुख्य संशयित आरोपी बाळ बोठे याला पोलिसांनी जेरबंद केले आहे. हैदराबाद येथून बोठेला ताब्यात घेण्यात आले आहे. नगरचाच पोलिसांनी ही कारवाई केली. यासंदर्भात पोलीस अधीक्षक सकाळी दहा वाजता पत्रकार परिषद घेऊन अधिक माहिती देणार आहेत. रेखा जरे यांची पारनेर तालुक्यातील जातेगाव घाटात 30 नोव्हेंबरला हत्या झाली होती. या हत्येत पाच जणांना अटक झाली आहे. मुख्य संशयित बाळ बोठे हा हत्येच्या दुसऱ्या दिवसापासून पसार होता. 

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post