तहानलेल्या लोकांसाठी नगर शहरात अरूणोदय जलकुंभ

 राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसने बसवलेल्या अरुणोदय जलकुंभाचा शुभारंभ आमदार संग्राम  जगताप यांच्या हस्ते झाला.
नगर: उन्हाळ्यामध्ये उन्हाची तीव्रता दिवसेंदिवस वाढत असल्यामुळे नागरिकांची रस्त्यावर भरदुपारी कामानिमित्त जाणेही असह्य झाले आहे. ग्रामीण भागातून नगरमध्ये कामानिमित्त नागरिक मोठ्या संख्येने येत असतात यामध्ये नागरिकांना पिण्याच्या पाण्याची गरज भासत असते विविध संस्थांनी पुढे येऊन शहरात पानपोळी सुरू करावे या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस पक्षाच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याशेजारी सकारात्मक दृष्टिकोनातून आमदार अरुण काका जगताप यांच्या वाढदिवसानिमित्त अरुणोदय जलकुंभ सुरू केला आहे.

 जलकुंभाच्या उद्घाटन आमदार संग्रामभैया जगताप यांच्या हस्ते झाले.यावेळी स्थायी समितीचे सभापती अविनाश तात्या घुले ,नगरसेवक डॉ सागर बोरुडे ,आयोजक राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस शहरजिल्हाध्यक्ष वैभव ढाकणे, माजी नगरसेवक संजय चोपडा, संतोष लांडे, संभाजी पवार, साहेबान जागीरदार ,अमित खामकर,दिलदारसिंग बिर ,संतोष ढाकणे ,लंकेश चितळकर, राहुल नेटके ,शुभम बंब, तुका कोतकर, सचिन गांगर्डे, संजय तवले, राधेय दांगट, सागर गानार,ऋषिकेश बागल,अनिकेत चव्हाण , मळू गाडाळकर, ऋषिकेश गवळी ,अतुल लवांडे, शरद सकट,संकेत कुऱ्हे,श्री गारडे, ऋषिकेश माळी, आदी उपस्थित होते.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post