अमरधाममध्ये गाडीच्या लाईटच्या उजेडात अंत्यविधी उरकण्याची वेळ..

 अमरधाममध्ये गाडीच्या लाईटच्या उजेडात अंत्यविधी उरकण्याची वेळ..नगर : नगर महापालिकेचा ढिसाळ कारभार मरणानंतरही नागरिकांसाठी संतापदायी ठरत आहे. नालेगाव अमरधाम येथे रात्रीच्या वेळी अंत्यसंस्कार करताना पुरेशी लाईटही उपलब्ध नाही. गाडीचे लाईट चालू ठेऊन त्या उजेडात अंत्यविधी उरकण्याची वेळ नागरिकांवर येत आहे. माजी नगरसेवक निखिल वारे यांनी अमरधाममधील गैरसोयीचा फोटो सोशल मीडियावर टाकून मनपाच्या कारभाराचे वाभाडे काढले आहेत.

वारे यांच्या पोस्ट मुळे मनपाला जाग येऊन अमरधाम येथे लाईटची व्यवस्था बसवण्याचे काम सुरुही झाले पण अशी वेळ येणे ही मनपाच्या दृष्टीने मोठी नामुष्कीच आहे.
0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post