१०० वर्षात प्रथमच... हापूस आंब्याची ५ डझनाची पेटी चक्क १ लाखाला

 हापूस आंब्याच्या पेटीला एक लाखांचा भावमुंबई: फळांचा राजा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या हापूस आंब्याला यंदा बाजारपेठेत नेहमीप्रमाणे विक्रमी किंमत मिळताना दिसत आहे. आंब्याचा मोसम नुकताच सुरु झाला असून सध्या बाजारपेठेत अत्यंत मर्यादित प्रमाणात आंब्याची आवक होत आहे. त्यामुळे बाजारपेठेत हापूस आंब्याला विक्रमी भाव मिळताना दिसत आहे.

नुकत्याच अंधेरी येथील झालेल्या एका लिलावात हापूस आंब्याच्या 5 डझनच्या पेटीला विक्रमी भाव मिळताना दिसला. राजापूरमधील बाबू अवसरे या शेतकऱ्याच्या 5 डझन हापूस आंब्याच्या पेटीला तब्बल 1 लाख 8 हजारांचा विक्रमी भाव मिळाला आहे. हापूस आंब्याच्या पेटीला इतकी किंमत गेल्या शंभर वर्षात मिळाली नव्हती. हा आजवरचा सर्वात मोठा विक्रम आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post