ऊर्जा राज्यमंत्र्यांनी 'ते' आरोप सिद्ध करून दाखवावे, अक्षय कर्डिले यांचं जाहीर आव्हान

 ऊर्जामंत्र्यांनी खोटे आरोप करण्यापेक्षा मतदारसंघातील प्रश्‍नांकडे लक्ष द्यावे : अक्षय कर्डिलेनगर : ऊर्जामंत्री प्राजक्त तनपुरे यांच्या मतदारसंघातील पाथर्डी व नगर तालुक्‍यातील २९ गावांची तिसगाव पाणी योजना वीजबिलापोटी अनेक दिवस बंद होती. आंदोलनाचा इशारा देताच बंद पाणी योजना सुरु करण्यात आली. आंदोलनाच्या इशाराची दखल न घेतल्याचे भासवत आमच्यावर टिका करण्याचे काम करत आहे. मतदारसंघातील थकित वीजप्रश्न मार्गी लावता येत नाही तर ते राज्याचे काय प्रश्न मार्गी लावणार. आता जिल्ह्यामध्ये व मतदारसंघामध्ये १0-१0 गावे मिळून वीजपुरवठा बंद करून वीजबिलाची वसुली करण्याचे काम जोरात सुरु आहे. शेतकरी संकट काळामध्ये ऊर्जा खात्याकडून गावे व वाड्यावस्त्या अंधारात ठेवण्याचे काम सुरु आहे. माजी मंत्री शिवाजीराव कर्डिले हे फोनवर एमएसर्डबीचे व डीपीचे प्रश्‍न मार्गी लावत होते. हे गेली १0 वर्षे राहुरी व पाथर्डी तालुक्‍यातील जनतेने पाहिले आहे. आमच्यावर खोटेनाटे आरोप करुन जनतेमध्ये गैरसमज पसरवून स्वत:चे राजकारण करत आहे. कुठलेही तथ्य नसताना बेछूट आरोप करण्यापेक्षा मतदारसंघातील ‍प्रश्नाकडे लक्ष द्या. १0 वर्षापूर्वी राहुरी मतदारसंघात माजी मंत्री कर्डिले निवडणूक लढविण्यासाठी उभे राहिले असता, मतदारसंघामध्ये अपप्राचार करीत असताना हे गुंड प्रवृत्तीचे लोक आहेत असे वाक्य काढण्यात आले होते, मात्र जनतेने कर्डिलेंना १0 वर्षे निवडून दिल्यानंतर त्यांना खरी परिस्थिती समजली. आताही कर्डिलेंच्या विरोधात मोठ्याप्रमाणात अपप्रचार करण्याचे काम सुरु आहे. बुऱ्हाणनगर पाणी योजनेतून चोरीच्या पाण्याचा आरोप केला. कुठलेही तथ्य नसताना स्वतःच्या राजकारणासाठी इतरांवर आरोप करण्याचा यांचा धंदा आहे.त्यांनी चोरीच्या पाण्याचा आरोप सिद्ध करुन दाखवावा, असे आवाहन भाजपा युवा मोर्चाचे सरचिटणीस अक्षय कर्डिले यांनी केले.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post