धक्कादायक....व्यसनाधिन बापाने केला मुलाचा निर्घृण खून

 व्यसनाधीन बापाने केला मुलाचा निर्घृण खून, शेवगाव तालुक्यातील आखेगाव येथील घटनानगर : दारुचे व्यसन असलेल्या बापाने आपल्या मुलाचाच खून केल्याची खळबळजनक घटना शेवगाव तालुक्यातील आखेगाव येथे मंगळवारी पहाटेच्या सुमारास घडली.पत्नी ताराबाई हिने मुलाच्या हत्येबाबत आपल्या पतीविरुद्ध पोलिस स्‍टेशन मध्ये फिर्याद दाखल केली आहे.

आखेगाव येथील गोरख किसन करपे या जन्मदात्या बापानेच सोमनाथ गोरख करपे (वय-१८) या बारावीत शिकणाऱ्या आपल्या मुलाचा लोखंडी गजाने आज (मंगळवार) पहाटे साडेतीन वाजता शेतात ऊसाला पाणी देत असताना खून केला. पत्नी ताराबाई हिने दारुच्या आहारी गेलेला पती गोरख याच्या विरुध्द खुनाचा गुन्हा दाखल केला आहे.

गोरख करपे हा दारूच्या आहारी गेला होता. त्‍यामुळे घरात कायम किरकोळ वाद होत होते. सोमवार दि. २९ रोजी गोरख दारू पिऊन घरी आला. यावेळी पत्नी ताराबाई सांयकाळी शेतातून घरी आल्यानंतर आज होळीचा सन असुनही तुम्ही सनासुदीचे दारू का पिवून आला असे विचारले. यावर रागावलेला पती पत्‍नीला मारण्याकरीता पुढे आला, पंरतु मुलगा सोमनाथ मध्ये आल्याने तिचा मार वाचला. त्यावेळी गोरखने मुलाला शिवीगाळ केली व तो घरातून निघून गेला.

त्यानंतर ताराबाई व मुलगा सोमनाथ हे दोघे जेवन करुन रात्री दहा वाजण्याच्या सुमारास  शेतात ऊसाला पाणी देण्यासाठी गेले. त्यांच्याबरोबर ताराबाईची जाउ मुक्ता भाऊसाहेब करपे ही त्यांच्या पिकाला पाणी देण्यास आली होती. सोमनाथ हा ऊसाला पाणी देत होता. पहाटे साडेतीन वाजण्याच्या सुमारास सोमनाथचा ओरडल्याचा आवाज आल्याने ताराबाई पळत त्याच्याकडे गेली असता, त्यावेळी गोरख हा मुलास डोक्यावर लोखंडी गजाने मारत असल्याचे तिने पाहिले. यावेळी सोमनाथ बांधावर खाली कोसळला. या मारहाणीत सोमनाथ गंभीर जखमी होऊण जागेवरच पडला. यावेळी त्याच्या डोक्यातुन रक्त येत होते.

मृत मुलाची आई ताराबाई हिने पतीविरूध्द खुनाचा गुन्हा दाखल केला असून, हे समजताच आरोपी फरार झाला आहे. पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक सुजित ठाकरे करीत आहेत.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post