ज्येष्ठ नाट्य आणि सिनेअभिनेते श्रीकांत मोघे यांचे निधन

 ज्येष्ठ नाट्य आणि सिनेअभिनेते श्रीकांत मोघे यांचे निधनपुणे- मराठी ज्येष्ठ नाट्य आणि सिनेअभिनेते श्रीकांत मोघे  यांचं वृद्धापकाळाने निधन झालं. ते ९१ वर्षांचे होते. ६ नोव्हेंबर १९२९ रोजी किर्लोस्करवाडी येथे त्यांचा जन्म झाला होता. त्यांच्या पश्चात पत्नी, अभिनेते शंतनू हे चिरंजीव आणि सून अभिनेत्री प्रिया मराठे असा परिवार आहे. मोघे यांच्या पार्थिवावर वैकुंठ स्मशानभूमीत रात्री उशिरा अंत्यसंस्कार करण्यात आले. दिवंगत कवी सुधीर मोघे त्यांचे कनिष्ठ बंधू होत.लग्नाची बेडी, अंमलदार अशी नाटके त्यांच्या बहारदार अभिनयाने गाजली. त्यांनी ६० हून अधिक नाटके आणि ५० हून अधिक चित्रपटांमध्ये भूमिका केल्या.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post