मोठी बातमी...पोलिस कर्मचाऱ्याच्या खून प्रकरणात आरोपींची निर्दोष मुक्तता

पोलिस कर्मचाऱ्याच्या खून प्रकरणात आरोपींची निर्दोष मुक्ततानगर: नगर जिल्ह्यातील शेवगाव पोलीस स्टेशनला कार्यरत पोलीस कर्मचारी दीपक कोलते यांच्या खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी पिन्या उर्फ सुरेश भरत कापसे याची सबळ पुराव्याअभावी न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली. फेब्रुवारी २०१५ मध्ये ही घटना घडली होती. समन्स बजावण्याच्या कामासाठी गेलेल्या कोलते यांचा तीक्ष्ण हत्याराने खून केल्याचा कापसे याच्यावर आरोप होता. मात्र, न्यायालयात तो सिद्ध होऊ शकला नाही. पोलिसांनी आरोपीविरोधात ओढूनताणून पुरावे तयार केल्याचा बचाव आरोपीतर्फे करण्यात आला.

 घटनेनंतंर आरोपी दीड वर्षे फरार होता. नगर, बीड, जालना व औरंगाबाद या चार जिल्ह्यांत गुन्हे दाखल असलेल्या कापसेविरूद्ध बीड जिल्ह्यात मोक्काही लावण्यात आला होता. शेवगाव तालुक्यातील पोलिसाच्या खून प्रकरणाचा निकाल आज लागला. न्यायालयाने आरोपी कापसे याच्यासह दत्ता विघ्ने व संतोष बोबडे यांची निर्दोष मुक्तता केली.

आरोपींतर्फे अॅड. सतीश गुगळे यांनी युक्तिवाद केला. त्यांनी तपासातील त्रुटी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिल्या. हे मुद्दे विचारात घेऊन न्यायालयाने आरोपींची सुटका केली.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post