एटीएम चोरुन 18 हजार रुपये लाटणारा आरोपी गजाआड

 


एटीएम चोरुन 18 हजार रुपये लाटणारा आरोपी गजाआडनगर : विजया बाळासाहेब गावखरे (रा.प्रियदर्शनी शाळेसमोर, नगर पाथर्डी रोड) यांचय पतीचे स्टेट बँकेचे एटीएम कार्ड चोरुन सुपा येथे ते एटीएम काड्र चालवून 18 हजार रुपये खात्यातून लंपास करणारा आरोपी पोलिसांनी गजाआड केला आहे. आदिनाथ रावसाहेब कार्ले (रा.चास, ता.जि.अहमदनगर) असे आरोपीचे नाव असून त्याच्याकडून चोरलेले एटीएम कार्ड आणि 18 हजार रुपये असा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. भिंगार कॅम्प पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक शिशिरकुमार देशमुख, पोहेकॉ जी.डी.गोल्हार, रमेश वराट, संतोष आडसूळ, राहुल व्दारके, अरूण मोरे यांच्या पथकाने ही कारवाई केली. 

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post