बादशाह को बचाने में कितनो की जान जाएगी?, अमृता फडणवीस यांचा निशाणा

 

बादशाह को बचाने में कितनो की जान जाएगी?

अमृता फडणवीस यांचा निशाणामुंबई : मुंबईचे माजी पोलीस आयुक्त आणि सध्याचे होमगार्ड प्रमुख परमबीर सिंह यांनी राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. या आरोपांवरुन एकच खळबळ उडाली असतानाच विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी ट्विटरवरुन ठाकरे सरकारवर नाव न घेता निशाणा साधला आहे. मात्र, त्यांनी आपल्या ट्विटमध्ये पोलीस सहायक सचिन वाझे, आणि टार्गेट 100 असा उल्लेख केला आहे.

अमृता फडणवीस यांनी आपल्या अधिकृत ट्विटर अकाउंटवरुन सरकारवर निशाणा साधला आहे. या ट्विटमध्ये त्यांनी दोन ओळींची शाहिरी शेअर केलीय. या ओळींद्वारे ठाकरे सरकारवर खोचक शब्दात टोला लगावण्यात आला आहे. “बात निकली है तो बहुत दूर तलक जाएगी, बादशाह को बचाने में कितनो की जान जाएगी?”, असं ट्विट अमृता फडणवीस यांनी केलं

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post