करोनाचा प्रचंड कहर... जिल्ह्यात २४ तासात 'इतक्या'नवीन बाधितांची भर

 जिल्ह्यात २४ तासात ८५७ नवीन बाधितांची भरनगर ः काेराेना संसर्गाच्या दुसऱ्या लाटेने जिल्ह्यात कहर केला असून बाधितांचा दररोज उच्चांक हाेत आहे. गेल्या 24 तासांमध्ये 857 जणांना काेराेना संसर्गाचे निदान झाले. नगर शहरात सर्वाधिक रुग्ण आहेत. नगर शहरातील बाधितांचा आकडा तीनशे जवळ पाेहाेचला आहे. नगर शहरात गेल्या 24 तासांमध्ये 291 जणांना काेराेना संसर्गाचे निदान झाले. वाढत्या बाधितांमुळे उपचारार्थींचा आकडा चार हजारच्या उंबरठ्याजवळ पाेहाेचला. गेल्या 24 तासांमध्ये वाढलेल्या उच्चांकी आकड्यामध्ये सर्वाधिक बाधित रुग्ण हे अहमदनगर शहरापाठाेपाठ राहाता तालुक्यात आहेत. या दाेन्ही ठिकाणी बाधितांची तीन अंकी रुग्णसंख्या आहे. अहमदनगर शहर 291, राहाता 111, संगमनेर 84, काेपरगाव 76, श्रीरामपूर 52, जामखेड 37, नगर तालुका 34, नेवासे 27, राहुरी 26, पारनेर 21, पाथर्डी 19, कर्जत 18, शेवगाव 15, भिंगार शहर 15, अकाेले 14, श्रीगाेंदे 06, इतर जिल्ह्यातील 11 जणांना काेराेना संसर्गाचे निदान झाले आहे. जिल्हा रुग्णालयाच्या प्रयाेगशाळेनुसार 319, खाजगी प्रयाेगशाळेनुसार 475 आणि रॅपिड चाचणीनुसार 63 जणांना काेराेना संसर्ग झाला आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post