करोनाचा विस्फोट कायम...24 तासात ‘इतक्या’ नवीन बाधितांची भर

 जिल्ह्यात चोवीस तासात 829 नवीन बाधितांची भर



नगर : नगर जिल्ह्यात करोनाचा विस्फोट कायम असून मागील चोवीस तासात 829 नवीन बाधिताची रूग्णसंख्येत भर पडली आहे. 48 तासात दोन हजारांपेक्षा जास्त रूग्ण आढळल्याने चिंता वाढली आहे. नगर शहरातही रूग्णवाढीचा आलेख कायम आहे. आज मनपा हद्दीत नवीन 239 रूग्णांची भर पडली आहे.  त्याखालोखाल कोपरगाव 89 आणि राहाता तालुक्यात 81 रूग्ण आढळून आले आहेत. नगर ग्रामीणमध्येही रूग्णवाढ मोठ्या प्रमाणात होत असून चोवीस तासात 74 बाधितांची भर पडली आहे. जिल्हा रूग्णालयाच्या आरटीपीसीआर तपासणीत 205, खासगी लॅबमधील तपासणी 404 तर रॅपिड अँटीजेन टेस्टमध्ये 220 बाधित आढळून आले आहेत.
तालुकानिहाय रूग्णसंख्या पुढीलप्रमाणे
नगर मनपा - 239, कोपरगाव -89, राहाता-81, नगर ग्रामीण-74, श्रीरामपूर-55, नेवासा-52, पारनेर-48, संगमनेर-97, कर्जत-32, राहुरी-30, पाथर्डी-29, अकोले-27, बाहेर जिल्ह्यातील रूग्ण-11, श्रीगोंदा-10, कॅन्टान्मेंट बोर्ड-9,  जामखेड-4, शेवगाव-2, मिलिटरी हॉस्पिटल-0

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post