819 रुपयांचा गॅस सिलेंडर फक्त 119 रुपयांमध्ये

819 रुपयांचा गॅस सिलेंडर फक्त 119 रुपयांमध्ये  नवी दिल्ली : घरगुती एलपीजी सिलेंडरच्या किंमती सध्या गगनाला भिडल्या आहेत. 2021 मध्ये अनुदानित सिलेंडरची किंमत आतापर्यंत 225 रुपयांपर्यंत वाढली आहे. दिल्लीत अनुदानित 14.2 किलो एलपीजी सिलेंडरची किंमत 819 रुपयांवर पोहोचली आहे. पण Paytm तुमच्यासाठी एक खास ऑफर घेऊन आलं आहे, त्याअंतर्गत तुम्ही फक्त 119 रुपयांमध्ये 819 रुपयांचा गॅस सिलेंडर घेऊ शकता. म्हणजे तुम्हाला थेट 700 रुपये कॅशबॅक मिळेल. तर मग जाणून घ्या या ऑफरचा कसा फायदा घ्यावा.

तुम्ही पेटीएमवर तुमचा एलपीजी सिलेंडर बुक करुन 700 रुपयांपर्यंतचा कॅशबॅक मिळवू शकता. अनुदानानंतर एलपीजी सिलेंडर 819 रुपये असून देशातील बहुतेक ठिकाणी पेटीएमच्या खास कॅशबॅकचा फायदा घेऊन तुम्ही तो फक्त 119 रुपयांत खरेदी करू शकता.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post