शहरासह जिल्ह्यात 'महा उद्रेक' कायम, २४ तासात 'इतक्या' नवीन बाधितांची भर

 

शहरासह जिल्ह्यात 'महा उद्रेक' कायम,  २४ तासात ६९२ नवीन बाधितांची भरनगर :  नगर जिल्ह्यात गेल्या 24 तासांमध्ये 692 जणांना काेराेना संसर्गाचे निदान झाले. त्यात नगर शहरात 220 रुग्णांचा समावेश आहे. 

अहमदनगर शहर 220, राहाता 75, संगमनेर 66, श्रीरामपूर 55, नेवासे 48, नगर तालुका 47, पाथर्डी 35, अकाेले 28, काेपरगाव 28, कर्जत 18, पारनेर 16, राहुरी 14, भिंगार शहर 11, शेवगाव 10, जामखेड 06, श्रीगाेंदे 06 आणि इतर जिल्ह्यातील 09 जणांना काेराेना संसर्गाचे निदान झाले. जिल्हा रुग्णालयानुसार 168, खाजगी प्रयाेगशाळेनुसार 361 आणि रॅपिड चाचणीमध्ये 163 जणांना काेराेना संसर्गाचे निदान झाले. नगर शहरातील एका व्यापार्याने त्याच्या वाढदिवसानिमित्त धार्मिक सहल नेली हाेती. या सहलीत 180 पेक्षा जास्त नागरिकांनी सहभाग घेतला हाेता. ही सहल वैष्णवदेवी, आग्रा तसेच अमृतसर, अशी आयाेजित केली हाेती. या सहलीमधील 150 जास्त लाेकांना काेराेना संसर्गाचे निदान झाले. या बाधितांपासून इतरांना बाधा झाली, हे प्रमाण वेगळेच आहे. त्यामुळे शहरातील रुग्णसंख्या वाढीसाठी, नागरिकांचा असा निष्काळजीपणा भाेवत आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post