जिल्ह्यात उद्रेक कायम, आजही ‘इतक्या’ नवीन बाधितांची भर

जिल्ह्यात उद्रेक कायम, आज 599 नवीन बाधितांची भर



नगर- कोरोना प्रतिबंधात्मक नियमांचे उल्लंघन झाल्यास अस्थपणा सात दिवसांसाठी बंद करण्याचे अधिकार तहसिलदारांना दिले आहेत. आजहीकाेराेनाबाधितांचा आकडा 600 च्या जवळ पाेहाेचला आहे. जिल्ह्यात आज 599 जणांना काेराेना संसर्गाचे निदान झाले. त्यात नगर शहरात 186 रुग्णांचा समावेश आहे. अहमदनगर शहर 186, राहाता 72, संगमनेर 29, श्रीरामपूर 83, नेवासे 22, नगर तालुका 21, पाथर्डी 34, अकाेले 06, काेपरगाव 21, कर्जत 20, पारनेर 13, राहुरी 33, भिंगार शहर 04, शेवगाव 29, जामखेड 05, श्रीगाेंदे 04 आणि इतर जिल्ह्यातील 17 जणांना काेराेना संसर्गाचे निदान झाले. जिल्हा रुग्णालयानुसार 51, खाजगी प्रयाेगशाळेनुसार 390 आणि रॅपिड चाचणीमध्ये 158 जणांना काेराेना संसर्गाचे निदान झाले. नगर शहरात कोरोना संसर्गाचे आकडे हे तीन अंकी आहेत. शहरातील वाढते आकडे हे महापालिका प्रशासनाची डोकेदुखी ठरत आहे. 

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post