शासकीय रुग्णालयात 33 आरोग्य कर्मचाऱ्यांना कोरोनाची बाधा

शासकीय रुग्णालयात 33 आरोग्य कर्मचाऱ्यांना कोरोनाची बाधा


 

सोलापूर : सोलापूर जिल्ह्यात दिवसेंदिवस कोरोनाबाधितांच्या संख्येत मोठी वाढ होत आहे. धक्कादायक बाब म्हणजे  वैद्यकीय कर्मचाऱ्यांना देखील कोरोनाची लागण झाली आहे. सोलापूरच्या शासकीय रुग्णालयात कोरोना बाधितांवर उपचार करणाऱ्या 33 आरोग्य कर्मचाऱ्यांना कोरोनाची बाधा झाली आहे. यामध्ये जवळपास 24 डॉक्टर तर 9 आरोग्य कर्मचारी आहेत. 


शासकीय रुग्णालयात उपचारासाठी कोरोना बाधित रुग्णांची संख्या वाढली आहे. त्याच पद्धतीने नॉन कोविड रुग्णांची संख्या देखील मोठी आहे. त्यामुळे शासकीय रुग्णालयातील कर्मचाऱ्यांवर आधीच ताण वाढलेला आहे. रुग्णालयात वाढणारी गर्दी आणि रुग्णांची संख्या यामुळे आरोग्य कर्मचाऱ्यांना देखील कोरोनाची बाधा होत आहे. दुसरीकडे सोलापूरच्या पोलीस प्रशिक्षण केंद्रात प्रशिक्षणासाठी आलेल्या पोलीस अधिकाऱ्यांना देखील कोरोनाची लागण झाली आहे. पोलीस प्रशिक्षण केंद्रातील 43 प्रशिक्षणार्थी अधिकाऱ्यांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर येत आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post