महाराष्ट्रात हाहाकार, आज 'इतक्या' हजार नवीन बाधितांची भर

 महाराष्ट्रात हाहाकार, आज '३०' हजार नवीन बाधितांची भरमुंबई : महाराष्ट्रात कोरोना प्रचंड वेगाने फोफावतोय. हा कोरोना इतका वाढत चाललाय की आज दिवसभरात राज्यात तब्बल 30,535 नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. गेल्या चार दिवसात फक्त महाराष्ट्रात एक लाखापेक्षा जास्त कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. ही महाराष्ट्रासाठी धोक्याची घंटा आहे. महाराष्ट्रातील नागरिकांनी आजही हे आकडे गांभीर्याने घेतले नाहीत. तर भविष्यात गंभीर परिस्थिती उद्भवण्याती शक्यता आहे. 

राज्यात मुंबई, पुणे, नागपूर, नाशिक या महत्त्वाच्या शहरांसह अनेक शहरांमध्ये कोरोनाचा प्रादूर्भाव वाढला आहे. विशेष म्हणजे हा कोरोना आता गाव-खेड्यातही थैमान घालायला लागलाय. प्रत्येक शहरांमध्ये कोरोनाबाधितांचा वाढता आकडा हा चक्रावून सोडणारा आहे. पुण्यात आज दिवसभरात तब्बल 2900 रुग्ण आढळले आहेत. तर मुंबईत 3775 रुग्ण आढळले आहेत. त्याचबरोबर नागपुरात 3614 रुग्ण आढळले आहेत. 

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post