परभणी जिल्ह्यात आजपासून 7 दिवसांची संचारबंदी
परभणी जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर कोरोनाचा संसर्ग वाढलाय या मार्च महिन्यातील 25 दिवसात जिल्ह्यात ३००० रुग्ण नव्याने आढळले आहेत तर 20 रुग्णांचा मृत्यू झालाय यामुळे कोरोनाचा संसर्ग थांबवण्यासाठी जिल्हाधिकारी दिपक मुगळीकर यांनी 1 एप्रिल पर्यंत 7 दिवसांची संचारबंदी लागू केली.या संचारबंदीची कडक अंमलबजावणी करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी दिपक मुगळीकर यांनी दिले आहेत.मात्र अनेक व्यापाऱ्यांनी या संचारबंदीला विरोध केला असला तरी जिल्हाधिकाऱ्यांनी काही सूट देऊन संचारबंदी मात्र कायम ठेवली आहे.
नांदेड जिल्ह्यात 25 मार्च ते 4 एप्रिल दरम्यान कडक लॉकडाऊन
नांदेड जिल्हा जिल्ह्यातील वाढत्या कोरोना रुग्णसंख्येमुळे नांदेड जिल्हा कोरोनाचा हाँटस्पाँट ठरत आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनाच्या वतीने दहा दिवसांचे कडक लॉकडाऊन जाहीर करण्यात आले आहे.आज 25 मार्च ते 4 एप्रिल पर्यंत लॉकडाऊन कडक राहणार आहे..भाजीपाला, किराणा जीवनावश्यक वस्तूही सकाळी 7 ते दुपारी 12 पर्यंत खरेदी करता येतील तर पार्सल सेवेची मुभा देण्यात आलीय. शिवाय जिल्हाअंतर्गत बससेवा ही बंद करण्यात आली आहे.
Post a Comment