सेल्फी काढण्याच्या नादात बोट उलटली, बापलेकाचा दुदैवी मृत्यू

सेल्फी काढण्याच्या नादात बोट उलटली, बापलेकाचा दुदैवी मृत्यू
 सोलापूर : बोटिंग करताना उभे राहून सहकुटुंब मोबाईलवर सेल्फी काढण्याचा प्रयत्न जीवावर बेतणारा ठरला. यात पिता-पुत्राचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना समोर आली आहे. सोलापुरात उजनी नदीपात्रात बोटीतून सैर करताना ही दुर्दैवी घटना घडली. बोट उलटल्यानंतर मायलेकींना वाचवण्यात यश आलं, परंतु बापलेकाचा बुडून मृत्यू झाला.विकास गोपाळ शेंडगे, अजिंक्य विकास शेंडगे यांचा दुर्दैवाने पाण्यात बुडून मृत्यू झाला.

बोट पाण्यात उलटताच शेंडगे कुटुंबीयांसह बोटीतील इतर प्रवासीही पाण्यात पडले. मच्छिमार आणि स्थानिक युवकांनी पत्नी स्वाती शेंडगे, मुलगी अंजली विकास शेंडगे यांच्याशिवाय अन्य चौघा जणांना पाण्यात बुडण्यापासून वाचवले.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post