दररोज 250 ग्रॅम दगड खाणारे आजोबा...31 वर्षांपासूनचा नेम

 

दररोज 250 ग्रॅम दगड खाणारे आजोबा...31 वर्षांपासूनचा नेमलहान मुलं जर माती किंवा छोटे दगड तोंडात घालत असेल तर त्याला लगेच आईचा धपाटा मिळतो. जास्त माती खाऊ नको असेही मोठी माणसं उपहासाने म्हणत असतात. पण सातारा जिल्ह्यातील एक आजोबा तब्बल 31 वर्षांपासून नित्यनियमाने बारीक खडे खातात. सध्या या आजोबांचा व्हिडिओ सोशल मिडियात व्हायरल झाला असून त्यावर अनेक प्रतिक्रियाही येत आहेत. 80 वर्षांचे आजोबा रामदास बोडके दररोज 250 ग्रॅम खडे खातात. आश्चर्याची बाब म्हणजे रामदास बोडके गेल्या 31 वर्षांपासून रोज खडे खातात त्यामुळे त्यांच्या घराच्यांना आणि गावकऱ्यांनाही याची सवय झाली आहे. गावकरी तर त्यांना दगड खाणारे आजोबा म्हणूनच ओळखतात.  आदर्की खुर्द गावाचे हे आजोबा सध्या लोकप्रिय होऊ लागले आहेत. रामदास बोडके 1989 मध्ये मुंबईला कामाच्या शोधात गेले होते. तिथे काम करताना त्यांना पोटदुखी सुरू झाली. त्यांनी मुंबईतल्या डॉक्टरांकडे उपचार घेतले पण पोटदुखी थांबली नाही. तीन वर्षांनी ते सातारा जिल्ह्यातल्या त्यांच्या गावी परतले. गावात शेती करतानाही हा त्रास कमी झाला नाही तेव्हा गावातल्या एका आजीबाईंनी त्यांना हा उपचार सांगितला. त्या म्हणाल्या रोज खडे खात जा. रामदास यांनी तेव्हापासून दररोज खडे खायला सुरुवात केली. 1989 सालापासून ते दररोज 250 ग्रॅम खडे खातात आणि त्यांची पोटदुखी थांबली आहे. अर्थात दगड खाण्याचा दावा हा आजोबांचा स्वत:चा असून वैद्यकीय दृष्ट्‌या ते कितपत योग्य आहे हे ज्याने त्याने ठरवायचे आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post