उपचाराधीन रूग्ण वाढले, आज 'इतक्या' नवीन बाधितांची भर

 *दिनांक ०१ मार्च, २०२१, रात्री ७ वा*


*आतापर्यंत ७३ हजार ७६५  रुग्ण बरे होऊन परतले घरी* 

 

*रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९६.९३ टक्के*


*आज १७८ रूग्णांना डिस्चार्ज तर २१९ नव्या बाधितांची रुग्ण संख्येत भर*



अहमदनगर: जिल्ह्यात आज १७८ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ७३ हजार  ७६५ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ९६.९३ टक्के इतके झाले आहे. दरम्यान, काल (रविवारी)  सायंकाळी सहा वाजले पासून आज सायंकाळी सहा वाजेपर्यंत रूग्ण संख्येत २१९ ने वाढ झाल्याने उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या आता ११९१ इतकी झाली आहे.


जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅब मध्ये ७३, खाजगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत १४४ आणि अँटीजेन चाचणीत ०२ रुग्ण बाधीत आढळले.


जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅब मध्ये बाधीत आढळून आलेल्या रुग्णामध्ये मनपा ३१, जामखेड ०३, कोपर गाव ०५, नगर ग्रामीण ०१, पारनेर ०३, संगमनेर १५, शेवगाव ०७, श्रीगोंदा ०८ अशा रुग्णांचा समावेश आहे.


खाजगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत बाधित आढळून आलेल्या रुग्णामध्ये मनपा १३, अकोले ०९, कर्जत ०३, कोपरगाव ०६, नगर ग्रामीण १०, नेवासा ०३,  पारनेर ०३, पाथर्डी ०२, राहाता १७, राहुरी ०२, संगमनेर २६, शेवगाव ०५, श्रीगोंदा ०२, श्रीरामपूर ०७ आणि इतर जिल्हा ०६ अशा रुग्णांचा समावेश आहे.


अँटीजेन चाचणीत आज ०२ जण बाधित आढळुन आले. नेवासा ०१,  राहाता ०१  अशा रुग्णांचा समावेश आहे.


दरम्यान, आज  डिस्चार्ज मिळालेल्या रुग्णामध्ये

मनपा ५३ अकोले ०१, जामखेड ०५, कर्जत ०३, कोपरगाव ०६, नगर ग्रामीण १३, नेवासा ०२, पारनेर २९, पाथर्डी ०६, राहाता १९, राहुरी ०३, संगमनेर १५, शेवगाव ०२, श्रीगोंदा ०९,  श्रीरामपूर ०८ आणि इतर जिल्हा ०४ अशा रुग्णांचा समावेश आहे.


*बरे झालेली रुग्ण संख्या:७३७६५  *


*उपचार सुरू असलेले रूग्ण: ११९१ *


*मृत्यू:११४४*


*एकूण रूग्ण संख्या:७६१००*


(स्त्रोत: नोडल अधिकारी, जिल्हा सामान्य रुग्णालय अहमदनगर)


*घराबाहेर पडताना चेहऱ्यावर मास्क अवश्य लावा*


*प्रतिबंधात्मक नियमांचे पालन करा*


*स्वतःच्या आणि कुटुंबियांच्या आरोग्याची काळजी घ्या*


*अधिकृत स्त्रोतांकडून आलेल्या माहितीवरच विश्वास ठेवा*

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post