सावधान...जिल्ह्यात करोनाचा उद्रेक कायम, आजही ‘इतक्या’ हजार नवीन बाधितांची भर

 24 तासांमध्ये 1347 जणांना काेराेना संसर्गाचे निदान



नगर - जिल्ह्यात काेराेना बाधितांच्या आकड्याने आज पुन्हा उच्चांक गाठला.  मार्च महिन्यातील ही सर्वाधिक रुग्णसंख्या ठरली. जिल्ह्यात गेल्या 24 तासांमध्ये 1 हजार 347 जणांना काेराेना संसर्गाचे निदान झाले. नगर शहरात सर्वाधिक 453 रुग्ण आढळले. त्या खालाेखाल राहाता आणि काेपरगाव तालुक्यात रुग्णसंख्या आहे. ती अनुक्रमे 116 आणि 102 एवढी आहे. अहमदनगर शहर 453, राहाता 116, संगमनेर 90, श्रीरामपूर 75, नेवासे 18, नगर तालुका 68, पाथर्डी 92, अकाेले 21, काेपरगाव 102, कर्जत 07, पारनेर 26, राहुरी 49, भिंगार शहर 26, शेवगाव 66, जामखेड 60, श्रीगाेंदे 60, मिलिटरी रुग्णालय 03 आणि इतर जिल्ह्यातील 16 जणांना काेराेना संसर्गाचे निदान झाले. भिंगार शहरात 26 जणांना काेराेना ससंर्गाचे निदान झाले. जिल्हा रुग्णालयानुसार 753, खाजगी प्रयाेगशाळेनुसार 454 आणि रॅपिड चाचणीमध्ये 148 जणांना काेराेना संसर्गाचे निदान झाले.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post