जिल्ह्यात करोनाचे थैमान, आज 1100 नवीन बाधितांची भर
नगर : नगर जिल्ह्यात करोनाचे थैमान कायम असून सलग तिसर्या दिवशी एक हजाराहून नवीन बाधित आढळून आले आहेत. मागील चोवीस तासात जिल्ह्यात 1100 नवीन रूग्णांची भर पडली आहे. यात सर्वाधिक रूग्ण नगर शहरात आढळून आले आहेत. नगर शहरात चोवीस तासात 399 बाधितांची भर पडली आहे.
अहमदनगर शहर 399, राहाता 64, संगमनेर 100, श्रीरामपूर 79, नेवासे 27, नगर तालुका 42, पाथर्डी 18, अकाेले 62, काेपरगाव 17, कर्जत 08, पारनेर 27, राहुरी 50, भिंगार शहर 75, शेवगाव 40, जामखेड 71, श्रीगाेंदे 16 आणि इतर जिल्ह्यातील 05 जणांना काेराेना संसर्गाचे निदान झाले. जिल्हा रुग्णालयानुसार 332, खाजगी प्रयाेगशाळेनुसार 395 आणि रॅपिड चाचणीमध्ये 373 जणांना काेराेना संसर्गाचे निदान झाले.
Post a Comment