जेवणाच्या ऑर्डरच्या वादातून ग्राहकास मारहाण, हॉटेलचालकांना सक्तमजुरीची शिक्षा

 जेवणाच्या ऑर्डरच्या वादातून ग्राहकास मारहाण, हॉटेलचालकांना सक्तमजुरीची शिक्षा नगर ः जेवणाच्या ऑर्डरच्या वादातून ग्राहकास मारहाण केल्याबद्दल हॉटेलचालक मतीन शेख (वय 34) व मोबिन शेख (वय 36) यांना जिल्हा सत्र न्यायालयाने 10 वर्षे सक्‍तमजुरीची शिक्षा व प्रत्येकी 51 हजार रुपये दंड केला. 

कलिम जहागिरदार, वसिम शेख व त्याचा मित्र हे 27 एप्रिल 2012 रोजी रात्री नगर कॉलेजजवळील चायनीज हॉटेलमध्ये जेवणासाठी गेले होते. मात्र, लवकर जेवण तयार न झाल्याने कलिम जहागीरदार यांनी पार्सल देण्यास सांगितले. त्याचा राग आल्याने हॉटेलचालक मतीन गफार शेख याने वसिम शेख यांना मारहाण केली. याबाबत जाब विचारणाऱ्या कलिम जहागिरदार यांना मतीन व मोबिन गफार शेख यांनी मारहाण केली. 
याबाबत कलिम जहागीरदार यांच्या फिर्यादीवरून कोतवाली पोलिस ठाण्यात मतीन व मोबिन शेख यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिस उपनिरीक्षक बी. एस. नागरगोजे यांनी गुन्ह्याचा तपास करून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. सरकारतर्फे या खटल्यात 7 साक्षीदार तपासण्यात आले. फिर्यादी, प्रत्यक्षदर्शी साक्षीदार, जखमींवर उपचार करणारे डॉक्‍टर, तपासी अधिकाऱ्यांच्या साक्षी महत्त्वपूर्ण ठरल्या. 
न्यायालयाने दोघांना प्रत्येकी 10 वर्षे सक्‍तमजुरी व 50 हजार रुपये दंड ठोठावला. सरकार पक्षातर्फे ऍड. मोहन कुलकर्णी यांनी काम पाहिले. सहायक फौजदार भानुदास बांदल यांनी पैरवी अधिकारी म्हणून काम पाहिले.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post