विडी कारखाने व कामगारांचा संप

 जाचक बंधने घातले जात असल्याच्या निषेधार्थ विडी कारखाने व कामगारांचा संपअहमदनगर (प्रतिनिधी)- केंद्र सरकारने 2003 च्या कोटप्पा कायद्यात दुरुस्ती करुन विडी उद्योग बंद करण्याच्या हेतूने घातलेले बंधन व जाचक कायद्याला विरोध दर्शविण्यासाठी लालबावटा विडी कामगार युनियन (आयटक), महाराष्ट्र राज्य विडी कामगार फेडरेशन, इंटक विडी कामगार संघटना व महाराष्ट्र विडी उद्योग संघाच्या वतीने गुरुवारी (दि.25 फेब्रुवारी) रोजी एकदिवसीय विडी कारखाने बंद ठेऊन संप करण्यात आला. शहरातील विडी कामगारांनी काम बंद ठेऊन नगर-पुणे महामार्गावरील विडी कंपनी समोर निदर्शने केली. तर सदर मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकारी कार्यालय येथे जाऊन देण्यात आले.  या आंदोलनात आयटकचे जनरल सेक्रेटरी अ‍ॅड.सुधीर टोकेकर, उपाध्यक्षा कॉ.भारती न्यालपेल्ली, इंटकचे अध्यक्ष शंकरराव मंगलारम, उपाध्यक्ष विनायक मच्चा, विडी कंपनीचे बाबू शांतय्या स्वामी, लक्ष्मी कोटा, कमलाबाई दोंता, सरोजनी दिकोंडा, शोभा बिमन, सरोजनी दिकोंडा, शारदा बोगा, विनायक मच्चा, कविता मच्चा, सगुना श्रीमल, लिला भारताल, ईश्‍वरी सुंकी, सतीश पवार, शोभा पासकंठी आदींसह विडी कामगार महिला सहभागी झाल्या होत्या.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post