आकर्षक व्हॅलेंटाईन गिफ्ट...फसव्या लिंक, मेसेजपासून सावध रहा

आकर्षक व्हॅलेंटाईन गिफ्ट...फसव्या लिंक, मेसेजपासून सावध रहा
 मुंबई व्हॅलेंटाईन डेच्या अनुषंगाने समाजमाध्यमांवर मोबाईल फोन, गिफ्ट्स स्किम, ताज हॉटेल कार्ड्स स्किम्स याबाबत फसवणूक करणाऱ्या लिंक व्हायरल होत आहेत. नागरिकांनी अशा खोट्या, फसव्या लिंकला कोणताही रिप्लाय करू नये, लिंकवर कोणतीही प्रतिक्रिया देऊ नये, असं आवाहन पोलिसांकडून करण्यात आलं आहे. व्हॅलेंटाईन डेच्या नावाने फसवणुकीचा मोठा प्रकारही घडू शकतो. कोणत्याही फसवणुकीपासून वाचण्यासाठी ठाणे पोलिसांकडून जनतेला सतर्क करण्यात आलं आहे. ठाणे पोलिसांनी ट्वीटरवरून याबाबत माहिती दिली आहे.


0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post