वाढती रुग्णसंख्या ही चिंतेची बाब...राज्य लॉकडाऊनच्या उंबरठ्यावर

राज्य पुन्हा एकदा लॉकडाऊनच्या उंबरठ्यावर -  मंत्री विजय वडेट्टीवारनागपूर :  महाराष्ट्रातली कोरोनाची वाढती रुग्णसंख्या पाहता राज्य पुन्हा एकदा लॉकडाऊनच्या उंबरठ्यावर आहे. तसंच मुंबई लोकलच्या फेऱ्याही कमी करण्याबाबत विचार सुरु असल्याचं मोठं आणि महत्त्वाचं वक्तव्य राज्याचे मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी केली आहे.

महाराष्ट्रातली एकूण वाढती रुग्णसंख्या ही चिंतेची बाब आहे. शासन पातळीवर उपाययोजना सुरु आहेत. उपाययोजना जरी सुरु असल्या तरी त्याचा रिझल्ट काय होईल, हे आज सांगता येत नसलं तरी महाराष्ट्र लॉकडाऊनच्या उंबरठ्यावर आहे, असं आपल्याला म्हणता येईल, असं वक्तव्य विजय वडेट्टीवार यांनी केलं.

आताच्या स्थितीत लॉकडाऊन परवडणारं नाही, अनेकांच्या पोटापाण्याचा प्रश्न आहे पण रुग्ण वाढ होतीय, हे गंभीर आहे. राज्यातील काही शहरात कडक निर्बंध घ्यावे लागतील, असं सांगत लॉकडाऊनचा सूचक इशारा मंत्री वडेट्टीवार यांनी दिला आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post