'या' कारणासाठी बाळासाहेब थोरात यांची थेट पश्चिम बंगालमध्ये पदयात्रा

 महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांची थेट पश्चिम बंगालमध्ये पदयात्राकोलकता: शेतकरी विरोधी तीन काळे कायदे मोदी सरकारने रद्द करावे या मागणीसाठी देशभर काँग्रेस जनआंदोलन करत आहे. काँग्रेस विधिमंडळ पक्षनेते तथा महसूल मंत्री नामदार बाळासाहेब थोरात हे पश्चिम बंगालच्या कोलकाता सेंट्रल काँग्रेसच्या वतीने आयोजित पदयात्रेत सहभागी झाले.


अधीर रंजन चौधरी यांच्या नेतृत्वाखाली पश्चिम बंगालमध्ये काँग्रेस व्यापक स्तरावर शेतकऱ्यांच्या हक्काची लढाई लढत आहे. तीन काळे कायदे नेस्तनाबूत करेपर्यंत देश स्वस्थ बसणार नाही.


यावेळी माजी मंत्री आमदार मनोज चक्रवर्ती, आमदार सॅफ्युअल आलम खान, पश्चिम बंगाल प्रदेश काँग्रेस कमिटीच्या सरचिटणीस शाहिना जावेद, तरुण आणि मेहनती जिल्हाध्यक्ष सुमन पॉल, एनएसयुआय चा जिल्हाध्यक्ष देबज्योती दास आदींसह कार्यकर्ते बहुसंख्येने उपस्थित होते.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post