शेतकरी आंदोलावरुन शरद पवारांनी सचिनचे तेंडुलकरचे कान टोचले

शेतकरी आंदोलावरुन शरद पवारांनी सचिनचे कान टोचले
 पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी शेतकरी आंदोलनावर आपली स्पष्ट भूमिका मांडली आहे. यात त्यांनी मोदी सरकारलाही आंदोलन कसं हाताळावं याविषयी सल्ला दिला. तसेच सचिन तेंडुलकरने घेतलेल्या भूमिकेवरही शरद पवारांनी भाष्य केलं. मोदी सरकारमधील वरिष्ठ नेत्यांनी शेतकरी आंदोलनात लक्ष घालण्याचा सल्ला पवारांनी दिलाय. तसेच सचिनने वेगळ्या क्षेत्राबद्दल बोलायचं असेल तर काळजी घेतली पाहिजे, असंही सांगितलं

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी शेतकरी आंदोलनावर ट्विट करणाऱ्या क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरला सल्ला दिलाय

शरद पवार म्हणाले, “सचिन तेंडुलकरने शेतकरी आंदोलनावर काही भूमिका घेतली असली, तरी सामान्य लोकांमध्ये त्याची प्रतिक्रिया उमटली आहे. त्यांनी वेगळ्या क्षेत्राबद्दल बोलायचं असेल तेव्हा काळजी घेतली पाहिजे, हा माझा सचिनला सल्ला आहे.”

“सरकारने शेतकरी आंदोलनामध्ये लक्ष घालण्याची गरज आहे. सरकारमधील वरिष्ठ लोकांनी यामध्ये लक्ष द्यावं. पंतप्रधान मोदी, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी आंदोलकांशी संवाद साधायला पाहिजे,” असंही त्यांनी नमूद केलं.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post