निवासी शाळेमधील 229 विद्यार्थ्यांना कोरोनाची लागण

वाशिममध्ये 229 विद्यार्थ्यांना कोरोनाची लागण

 


वाशिम जिल्ह्यातील देगाव परिसरात एक आदिवासी निवासी शाळा आहे. या शाळेतील 327 पैकी एकूण 229 विद्यार्थ्यांना कोरोनाची लागण झाली आहे. विद्यार्थ्यांसह चार कर्मचाऱ्यांनाही कोरोनाची लागण झाली आहे. कोरोना झालेले बहुतांश विद्यार्थ्यांचे वय हे 13 ते 15 इतके आहे. तसेच बहुतांश विद्यार्थी हे अमरावती जिल्ह्यातील धारणी,अचलपूर आणि मेळघाट पट्टयातील भागातील आहेत.

हे सर्व विद्यार्थी 14 फेब्रुवारीला शाळेत दाखल होते. या सर्व विद्यार्थ्यांची RTPCR चाचणी करण्यात आली होती. या चाचणीनंतर कोरोना संसर्ग झाल्याची माहिती समोर आली आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post