शिवसेनेचं राज्यभरात ‘शिवसंपर्क’ अभियान

शिवसेनेचं राज्यभरात ‘शिवसंपर्क’ अभियान मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत वर्षा निवासस्थानी शिवसेनेची ही बैठक पार पडली. या बैठकीला शिवसेनेचे अनेक ज्येष्ठ नेते, मंत्री, आमदार, खासदार आणि राज्यातील सर्व जिल्हा प्रमुख, जिल्हा संपर्कप्रमुख उपस्थित होते. उद्धव ठाकरे मुख्यमंत्रीपदी विराजमान झाल्यानंतर शिवसेनेची ही पहिलीच बैठक होती. या बैठकीनंतरच राज्यभरात शिवसेनेचे शिवसंपर्क अभियान सुरु करण्यात येणार असल्याची माहिती दिली. गावोगावी शिवसेना पोहोचवण्याचे आदेश उद्धव ठाकरे यांनी दिल्याचं आढळराव-पाटील यांनी सांगितलं. गावोगावी शिवसेना पोहोचवण्यासाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आदेश दिले आहेत. त्यांच्या आदेशानुसार आता 23 फेब्रुवारी ते 27 फेब्रुवारीदरम्यान राज्यभरात शिवसेनेचं ‘शिवसंपर्क’ अभियान राबवलं जाणार आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post