जि.प.कर्मचारी सोसायटीसह अन्य सहकारी संस्थांचा निवडणूक कार्यक्रम जाहीर होणार

जि.प.कर्मचारी सोसायटीसह अन्य सहकारी संस्थांचा निवडणूक कार्यक्रम जाहीर होणार नगर- नगर जिल्ह्यातील मुदत संपलेल्या सहकारी संस्थांच्या निवडणुकांचा बिगुल वाजला असून, जिल्हा परिषद कर्मचारी पतसंस्थेसह जिल्ह्यातील 50 विविध कार्यकारी सेवा सोसायट्यांचा निवडणूक कार्यक्रम 22  फेब्रुवारीला जाहीर होणार आहे.

राज्य शासनाने सहकारी संस्थांच्या निवडणुकांवरील स्थगिती उठविल्यानंतर पहिल्या टप्प्यात जिल्हा बँकेसह तीन कारखाने व अठरा सेवा सोसायट्यांचा निवडणूक कार्यक्रम सुरू झालेला आहे. यातील तीनही कारखाने  बिनविरोध झाले आहेत तर जिल्हा बँकेची निवडणूक 20 फेब्रुवारीला होत आहे. राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणने बुधवारी (दि. 10) सहकारी संस्थांच्या निवडणुकांचा कार्यक्रम 15 फेब्रुवारीपासून सुरू करण्याचे आदेश दिले. त्यानुसार नगर जिल्ह्यातील 50 सहकारी संस्थांच्या निवडणुकांचा कार्यक्रम 22फेब्रुवारी रोजी जाहीर केला जाणार असल्याचे जिल्हा उपनिबंधक कार्यालयाकडून सांगण्यात आले. यामध्ये जिल्हा परिषद कर्मचारी पतसंस्थेच्या निवडणुकीचा समावेश आहे0

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post