शिवसेना केंद्र सरकारविरोधात इंधन दरवाढी विरोधात आंदोलन करणार आहे. तर भाजप वीज बिलाच्या मुद्यावरुन ठाकरे सरकारला घेरण्याच्या तयारीत आहे.
मुंबई : आज राज्यात भाजप विरुद्ध शिवसेना असं चित्र दिसणार आहे कारण, शिवसेना आणि भाजप दोन्ही पक्ष आज वेगवेगळ्या विषयांवर आंदोलनं करणार आहेत. शिवसेना केंद्र सरकारविरोधात इंधन दरवाढी विरोधात आंदोलन करणार आहे. तर भाजप वीज बिलाच्या मुद्यावरुन ठाकरे सरकारला घेरण्याच्या तयारीत आहे
सध्या देशात पेट्रोल शंभरी पार करण्याच्या स्थितीत आहे. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत कच्च्या तेलांची किंमत कमी असतानाही भारतात मात्र पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले आहेत. त्यामुळे शिवसेना आज राज्यभर मोर्चे काढणार आहे. पेट्रोल- डिझेल दरवाढीविरोधात शिवसेनेनं केंद्र सरकारविरोधात राज्यभर तीव्र आंदोलन करणार आहे.
Post a Comment