बसस्थानकात उभ्या असलेल्या 6 शिवशाही बस आगीत भस्मसात

बसस्थानकात उभ्या असलेल्या 6 शिवशाही बस आगीत भस्मसात सातारा : साताऱ्यात एसटी स्टॅंड परिसरात उभ्या असलेल्या 6 शिवशाही बसला भीषण आग लागली. या आगीचं कारण अद्याप अस्पष्ट आहे. अग्नीशमनदालाने ही आग सध्या नियंत्रणात आणली आहे. या आगीत कोणतीही जीवितहानी झालेली नाही. मात्र, सहा शिवशाही बसचं मोठं नुकसान झालं आहे. या आगीमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. या बसच्या बाजूला मोठी इमारत आहे. याशिवाय मॉलदेखील जवळ आहे. त्यामुळे मोठी दुर्घटना घडण्याची भीती होती. मात्र, प्रशासनाच्या तत्परतेमुळे मोठी दुर्घटना टळली आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post