पवारांचे ‘ते’ वक्तव्य म्हणजे अहिल्यादेवी होळकरांचा मोठा अपमान : माजी मंत्री राम शिंदे...पहा व्हिडिओ

 हा तर अहिल्यादेवी यांचा अपमान -  माजी मंत्री शिंदे'पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या पेक्षा नातवाचा मतदारसंघात श्रेष्ठ आहे, व त्यांच्या मतदारसंघात अहिल्यादेवी यांचा जन्म झाला आहे, अशा आशयाचे वक्तव्य शरद पवार यांनी करणे म्हणजे हा अहिल्यादेवी यांचा अपमान आहे,' अशी टीका भाजप प्रदेश उपाध्यक्ष तथा माजी मंत्री प्रा. राम शिंदे यांनी केली.

जेजुरी येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या पुतळ्याचे नुकतेच अनावरण करण्यात आले आहे. या ठिकाणी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी भाषण केले. त्या भाषणामधील वाक्य पकडत आता प्रा. शिंदे यांनी शरद पवार यांच्यावर टीका केली आहे.

शिंदे म्हणाले की, 'जेजुरी येथे पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या पुतळ्याचे अनावरण शरद पवार यांच्या हस्ते झाले. यावेळी पवार यांनी जे नातवाच्या प्रेमापोटी वक्तव्य केले, आणि अहिल्‍याबाईंपेक्षा नातवाचा मतदारसंघात श्रेष्ठ आहे व त्यांच्या मतदारसंघात अहिल्यादेवी यांचा जन्म झाला आहे, असे बोलणे म्हणजे हा अहिल्यादेवी यांचा अपमान करणारी घटना आहे. शरद पवार हे राजकारणात, लोकशाहीत अर्धशतक पूर्ण करणारे नेते आहेत. त्यांच्या तोंडातून जे वाक्य गेले ते अनावधानाने गेले असेल किंवा त्यांची जीभ घसरली असेल, असे मला वाटते. परंतु  अहिल्यादेवींचा असा नामोल्लेख करणे ही गंभीर चूक असून हा अवमान आहे,' असेही शिंदे म्हणाले.


व्हिडिओ सौजन्य- विक्रम बनकर0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post